esakal | VIDEO: 'कोरोना देशातून निघून जा'; मंत्र्याने एअरपोर्टवर केली पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

usha tharoor.

मध्य प्रदेशच्या पर्यटनमंत्री उषा ठाकूर यांनी कोरोना विषाणूपासून सुटका करुन घेण्यासाठी भक्तीचा मार्ग धरल्याचं पाहायला मिळत आहे. उशा ठाकूर यांनी इंदौर एअरपोर्ट परिसरात अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याची पूजा केली आहे

VIDEO: 'कोरोना देशातून निघून जा'; मंत्र्याने एअरपोर्टवर केली पूजा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

भोपाळ- कोरोना महामारीचा संसर्ग वाढला असून देशात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहे. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स दिवसरात्र काम करुन रुग्णांवर उपचार करत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढवण्यासाठी राज्य सरकारही कठोर निर्बंधांचा अवलंब करत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढतच असल्याने लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय घेण्याची चाचपणीही केली जात आहे. त्यात मध्य प्रदेशच्या पर्यटनमंत्री उषा ठाकूर यांनी कोरोना विषाणूपासून सुटका करुन घेण्यासाठी भक्तीचा मार्ग धरल्याचं पाहायला मिळत आहे. उषा ठाकूर यांनी इंदौर एअरपोर्ट परिसरात अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याची पूजा केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी व्हावा यासाठी त्यांनी ही पूजा  केली आहे. विशेष महत्त्वाचं म्हणजे त्या याआधी अनेकदा सार्वसजिक ठिकाणी मास्क न घालता वावरताना दिसल्या होत्या. पूजेदरम्यानही त्यांनी मास्क घातला नव्हता. 

‘ब्रेक द चेन’मुळे कलाकारांना फटका; जगणं झालंय कठीण

उषा ठाकूर यांनी यापूर्वी दावा केला होता की, त्या कोरोना विषाणूविरोधात इम्युन आहेत. कारण, त्या वैदिक जीवनपद्धतीचं पालन करतात. शिवाय त्या घरात नेहमी हवन करतात आणि हनुमान चालिसेचं पठन करतात. उशा ठाकूर यांनी असाही दावा केला होता की, गाईचे शेण कोरोना विषाणूला आपल्यापासून 24 तासांसाठी दूर ठेवू शकते. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी टीका केली होती. एअरपोर्टवर त्यांनी केलेल्या पूजेमुळेही विरोधक टीका करत आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेमध्ये गेल्या 24 तासांत 4986 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 3,32,206 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात 24 रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 4160 झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये सध्या 32,707 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. असे असले तरी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात लॉकडाऊन करणार नसल्याचं स्पष्ट केलंय.