यूपी, बिहारनंतर आता मध्य प्रदेशात नदीत आढळले मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP

यूपी, बिहारनंतर आता मध्य प्रदेशात नदीत आढळले मृतदेह

भोपाळ- बिहारच्या बक्सारमध्ये गंगा नदीत अनेक मृतदेह सापडत असल्याची घटना ताजी असताना मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये रुंज नदीमध्येही मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पन्ना जिल्ह्यातून वाहणाऱ्या केन नदीची उपनदी रुंजमध्ये मृतदेहांचा ढीग पाहायला मिळाला आहे. नन्दनपुर गावाच्या जवळ नदीत मृतदेह किनाऱ्यावर अडकून पडले आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कमीतकमी ६ मृतदेव सापडले आहेत. नदीमध्ये आणखी मृतदेह असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (mp news panna dead bodies found in runj river madhya pradesh)

हेही वाचा: गाझीपूरमध्येही गंगा मैलीच; पुन्हा मृतदेह आढळल्याने खळबळ

गावकऱ्यांनी सांगितलं की, मृतदेह मिळण्याचा प्रकार गेल्या ३-४ दिवसांपासून सुरु आहे, पण प्रशासनाने याची अजून दखल घेतलेली नाही. स्थानिकांना भीती आहे की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मृतदेहांना जाळण्याच्या ऐवजी त्यांना नदीमध्ये सोडण्यात येत आहे. रुंग नदी प्रामुख्याने पन्ना जिल्ह्याच्या सीमेवरुन वाहते. त्यामुळे मिळालेले मृतदेह पन्ना जिल्ह्यातील असण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे बिहारच्या बक्सारमध्ये गंगा नदीमध्ये अनेक मृतदेह आढळून आले आहेत. राज्य सरकारच्या माहितीनुसार आतापर्यंत ७३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सांगितलं जातंय की, कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांचे हे मृतदेह आहेत. राज्याच्या मंत्र्याचा दावा आहे की, सर्व मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत आले आहेत.

Web Title: Mp News Panna Dead Bodies Found In Runj River Madhya

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top