

Police Allegedly Threatening Youth With Ganja Case
Esakal
हॉटेलमध्ये गेलेल्या एका कपलला दमदाटी करत तरुणावर गांजा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी पोलीसच देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात घडलेल्या य़ा घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. हॉटेलमध्ये थांबलेल्या जोडप्याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लान पोलिस अधिकारी आखत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओत एका अधिकाऱ्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना तरुणाच्या बॅगेत गांजा ठेवण्यास सांगितल्याचे ऐकू येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.