Crime: तुमचा मुलगा धाडसी होता...; वडिलांना मेसेज पाठवत विद्यार्थ्याची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

railway track suicide

तुमचा मुलगा धाडसी होता...; वडिलांना मेसेज पाठवत विद्यार्थ्याची आत्महत्या

भोपाळ : आपल्या वडिलांना मेसेज पाठवत मध्यप्रदेशमधील एका अभियंता तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रेल्वे रूळावर दोन तुकडे झालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी आत्महत्या केल्याचं सांगत त्याच्या मृत्यूची नोंद केली असून त्याने आपल्या वडिलांना पाठवलेल्या मेसेजमुळे खळबळ पसरली आहे.

निशांक राठोड असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव असून त्याच्या मृत्यूच्या आधी त्याने आपल्या वडिलांच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला होता. त्यामध्ये, "राठोड साहेब आपला मुलगा खूप धाडसी होता...गुस्ताक ए-नबी की एकही सजा, तन सर से जुदा" असा मेसेज पाठवल्याने या रहस्यमयी मृत्यूने खळबळ पसरली असून पोलिसांकडून तपासातून त्याने आत्महत्या केल्याचे निष्कर्ष काढले जात आहेत. रेल्वेच्या वेळेची आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असताना त्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: कुस्तीगीर परिषदेत शरद पवारांना धक्का; भाजपचा उमेदवार होणार अध्यक्ष

दरम्यान, उमाशंकर राठोड असं आत्महत्या करणाऱ्या निशांकच्या वडिलांचं नाव असून ते सरकारी नोकर आहेत. ते नर्मदापूर येथील सिओनी माळवा येथे राहत आहेत. तर निशांक हा आपल्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीसाठी भोपाळमध्ये आला होता. "निशांक स्कूटी भाड्याने घेऊन नर्मदापूरकडे निघाला होता. पण त्याच्या मनात काहीतरी आले असावे म्हणून तो परत भोपाळकडे निघाला होता." असं पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर सांगितलं. "सायंकाळी पाच वाजून ४४ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो टाईप केलेला मेसेज होता." असं निशांकच्या वडिलांनी सांगितलं.

"त्याने मला कॉल केला होता पण मी त्यावेळी दुसऱ्या फोनवर होतो. नंतर मी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याने फोन उचलला नाही." असं उमाशंकर राठोड यांनी सांगितलं आहे. दरम्यान त्याने आत्महत्या केली नसून त्या मेसेजमुळे हा घातपात असल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे. तर ज्यावेळी त्याच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना मेसेज पाठवण्यात आला होता त्याचवेळी या ओळींसह इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचे आणि जवळच्या मित्रांचे जबाब नोंदवले आहेत. तर अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Mp Student Suicide After Send Message On Father Mobile

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Madhya Pradeshcrime