esakal | ...अन् खासदार सुप्रिया सुळे बरसल्या मोदी सरकारवर
sakal

बोलून बातमी शोधा

...अन् खासदार सुप्रिया सुळे बरसल्या मोदी सरकारवर

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले. 

...अन् खासदार सुप्रिया सुळे बरसल्या मोदी सरकारवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना काळात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली कोरोनामुळे यंदाच्या अधिवेशनात अनेक बदल करण्यात आले आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली. त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये महाराष्ट्रातील बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली. त्यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान म्हटले की, ''सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती आणि बेरोजगारी हे आपल्या देशासमोरील प्रमुख मुद्दे आहेत. आपण अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच या मुद्द्यांवरील चर्चेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.''

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची फटका केवळ आपल्या देशालाच बसलेला नाही. जगभरात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या मुद्द्यालाच प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, केंद्र सरकार अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या समस्येविषयी फार काही बोलताना दिसत नाही. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही सुळे पुढे म्हणाल्या. 

व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेच्या पुरस्कारावर मराठमोळ्या 'चैतन्य'ने कोरले आपले नाव

कोरोनामुळे यंदाच्या अधिवेशनात अनेक बदल करण्यात आले आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली. कोरोनासाठी आवश्यक सर्व खबरदारी घेण्यात आली असून यावेळी अधिवेशनात शनिवार रविवारची सुट्टी रद्द करण्यात आली आहे, अशी माहितीही मोदींनी दिली. 

देशातील कोरोना रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण ७७.८८ टक्क्यांवर

दरम्यान, आज अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी प्रश्नोत्तराचा तास वगळल्यावरून सरकारवर टीका केली. प्रश्नोत्तराचा तास हा सुवर्ण अवधी असतो. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीचे कारण देत सरकारने प्रश्नोत्तराचा तास रद्द केला. तुम्ही संसदेचे इतर सर्व कामकाज सुरु ठेवलेत केवळ प्रश्नोत्तराचा तास वगळलात. तुम्ही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहात, अशी टीका अधिर रंजन चौधरी यांनी केली. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)