Video : मुख्यमंत्री ध्वजारोहण करणार तिथेच काँग्रेस नेत्यांची हाणामारी

वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ जिथे ध्वजारोहण करणार तिथेच काँग्रेस कार्यकर्त्यांची हाणामारी झाली आहे. काँग्रेसचे कार्यालय गांधी भवनमध्ये ध्वजारोहणावेळी गोंधळ निर्माण झाला. पक्षाचे दोन नेतेच एकमेकांवर धावून गेल्याचा प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंदौर : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ जिथे ध्वजारोहण करणार तिथेच काँग्रेस कार्यकर्त्यांची हाणामारी झाली आहे. काँग्रेसचे कार्यालय गांधी भवनमध्ये ध्वजारोहणावेळी गोंधळ निर्माण झाला. पक्षाचे दोन नेतेच एकमेकांवर धावून गेल्याचा प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होतं. यावेळी घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे. काँग्रेसचे नेते देवेंद्र सिंग यादव आणि चंदू कुंजीर एकमेकांवर धावून गेले असल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले आहे.

प्रजासत्ताकदिनीच आसाममध्ये चार बाम्बस्फोट

व्हिडिओमध्ये चंदू कुंजीर यांनी देवेंद्र सिंग यांना कानाखाली लगावल्याचं दिसंत आहे. यानंतर वाद आणखी वाढला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोघांना शांत केले असाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. कमलनाथ या कार्यक्रमासाठी शनिवारी संध्याकाळीच इंदौरमध्ये दाखल झाले होते. मुख्यमंत्री पोहोचताच कुंजीर 15-15 लोकांसह मंचावर जात होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp two congress leaders devendra singh yadav and chandu kunjir video viral