Police Recruitment : YouTube वरील अश्लील...; पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थी थेट कोर्टात

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्या विद्यार्थाला चांगलेच फटकारत दंडही ठोठावला आहे.
Supreme Court
Supreme Court esakal
Updated on

Supreme Court : स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी आहेत. अनेकांना यात यश येते तर काही विद्यार्थी कठोर परिश्रम करत मोठ्या पदावर रुजू होतात. त्यात अनेकदा विविध मागण्यांसाठी स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थांच्या आंदोलनांमुळे हे विद्यार्थी चर्चेत असतात.

हेही वाचा- Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

मात्र, यावेळी कोणत्या भरतीमुळे, आंदोलनामुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा एक विद्यार्थी चर्चेचा विषय ठरला आहे. युट्युबवरील अश्लील जाहिरातीमुळे पोलीस भरतीच्या परिक्षेत नापास झाल्याचा दावा या विद्यार्थाने केला आहे. या विरोधात थेट कार्टाची पायरी चढत विद्यार्थ्याने गुगलकडे 75 लाख रुपयांची नुकसान भरपाईची देण्याची मागणी केली आहे.

Supreme Court
Elon Musk : ट्वीटरवर तुमचे फॉलोअर्स होणार कमी? मस्क मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्या विद्यार्थाला चांगलेच फटकारत दंडही ठोठावला आहे. मध्यप्रदेशातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या पन्ना येथील आनंद किशोर चौधरी याने ही याचिका दाखल केली होती. ज्यात त्याने पोलीस भरती आणि राज्य विद्यार्थाने गूगलविरोधात याचिका दाखल केली होती. ज्यात त्याने युट्यूबवरील अश्लील जाहिरातींमुळे लक्ष विचलित झाल्याने पोलीस भरती परिक्षेत नापास झाल्याचे विद्यार्थ्याने याचिकेत म्हटले होते तसेच 75 लाखांची नुकसान भरपाईची मागणी केली होती. दरम्यान, आनंद किशोर चौधरी याच्या याचिका कोर्टाने फेटाळत त्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com