'हा हिंदू धर्म आहे का?'; सलमान खुर्शीद यांच्या घरावर हल्ला, केली जाळपोळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'हा हिंदू धर्म आहे का?'; खुर्शीद यांच्या घरावर हल्ला, केली जाळपोळ

'हा हिंदू धर्म आहे का?'; खुर्शीद यांच्या घरावर हल्ला, केली जाळपोळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचे पुस्तक 'Sunrise Over Ayodhya: Nationhood in Our Times' नुकतंच प्रकाशित झालं असून ते वादग्रस्त ठरलं आहे. या पुस्तकावरचा वाद इतका टोकाला गेला आहे की आता हिंदूत्ववाद्यांनी सलमान खुर्शीद यांच्या नैनितालमधील घरावर हल्ला केला आहे. त्यांच्या घराच्या दाराला आग लावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घराच्या खिडक्या फोडण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वत:चं त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन दिली आहे. त्यांनी या हल्ल्याचे फोटो आणि व्हिडीओ फेसबुकवरुन शेअर केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, तर आता युक्तीवादाची ही पद्धत झाली आहे. हा हिंदू धर्म असू शकत नाही असं जे मी म्हणतोय ते म्हणण्यात माझी अजूनही चूक आहे का? असा उद्विग्न सवालही त्यांनी केला आहे.

याबाबत ट्विट करत शशी थरुर यांनी निषेध नोंदवला आहे. त्यांनी म्हटलंय की, हे लांच्छनास्पद आहे. सलमान खुर्शीद हे राज्यकर्ते राहिले आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला अभिमान वाटेल असं प्रतिनिधीत्व केलंय आणि देशाविषयी नेहमीच समतोल, सर्वसमावेशक असा दृष्टीकोन मांडला आहे. सत्तेत असलेल्यांनी आपल्या राजकारणामध्ये वाढत चाललेल्या या असहिष्णुतेच्या पातळीचा निषेध केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सलमान खुर्शीद यांनी म्हटलंय की, ज्या मित्रांनी माझ्यासाठी हे निमंत्रण सोडलं आहे त्यांच्यासाठी माझे हे दरवाजे मला उघडे करता येतील आशा आहे. हा हिंदू धर्म असू शकत नाही असं जे मी म्हणतोय ते म्हणण्यात माझी अजूनही चूक आहे का? असा उद्विग्न सवाल त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणालेत की, , तर आता युक्तीवादाची ही पद्धत झाली आहे. लज्जास्पद हा शब्द देखील फारच कुचकामी आहे. मी अजूनही अशी आशा ठेवतो की, 'असहमत असण्यास सहमत' आहोत, हे मान्य करण्यासाठी एकेदिवशी एकमेकांचा आधार ठरु, असं त्यांनी म्हटलंय.

काय आहे वाद?

या पुस्तकातील एक प्रकरण 'द सॅफ्रॉन स्काय' मध्ये मांडण्यात आलेल्या एका विधानावरुन हा वाद सुरु झाला आहे. खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटना ISIS आणि बोको हरामसोबत केली आहे. या तुलनेवरुन होत असलेला

याबाबत स्पष्टीकरण देताना खुर्शीद यांनी म्हटलंय की, हिंदू धर्म हा खूपच सुंदर धर्म आहे. तसेच भाजप आणि RSSच्या वतीने त्यांच्याविरुद्ध कुणीतरी तक्रार दाखल करणे याहून दुसरा मोठा अपमान नाही. या देशात स्वातंत्र्य आहे की नाही? आपल्याला विचार करण्याचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य उरलं आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

loading image
go to top