esakal | कमी प्रतिकारशक्तीमुळे होणारा म्युकरमायकॉसिस संसर्गजन्य नाही : AIIMS
sakal

बोलून बातमी शोधा

'कमी प्रतिकारशक्तीमुळे होणारा म्युकरमायकॉसिस संसर्गजन्य नाही'

'कमी प्रतिकारशक्तीमुळे होणारा म्युकरमायकॉसिस संसर्गजन्य नाही'

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाचं संकट थैमान माजवत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक लोक बळी पडले असून सध्या आरोग्य यंत्रणेवर अभूतपूर्व असा ताण आहे. अशातच आता म्युकरमायकॉसिसचं नवं संकट उभं ठाकलं आहे. अत्यंत दुर्मिळ असणारा हा रोग आता इतका आढळून येतो आहे की केंद्र सरकारने या रोगाचा समावेश साथरोग कायद्यामध्ये करुन याला महामारी घोषित केलं आहे. म्युकरमायकॉसिसबाबत सध्या पुरेशी जागृती झाली नाहीये. यासंदर्भात आता आरोग्य मंत्रालय लोकांना माहिती देत आहे. (mucormycosis is not a communicable disease Dr Randeep Guleria Director Delhi AIIMS)

बुरशीचा रंग वेगवेगळ्या भागात वेगवेगळा विकसित होऊ शकतो. म्युकरमायकॉसिस हा संसर्गजन्य आजार नाहीये, असं विश्लेषण Delhi AIIMS चे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केलं आहे. ज्या लोकांमध्ये कमी रोग प्रतिकारक शक्ती आहे, त्यांना म्युकरमायकॉसिस, कॅनडिडा आणि एस्पारोजेनस हे दुर्मिळ आजार होतात. ही बुरशी मुख्यत: सायनस, नाक, डोळ्याभोवतीच्या हाडांमध्ये आढळते तसेच ती मेंदू देखील प्रवेश करू शकते. कधीकधी ती फुफ्फुसांमध्ये (फुफ्फुसाचा म्यूकरमायकॉसिस) किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये देखील आढळते.

कोरोनानंतर म्हणजेच पोस्ट कोविड काळात दिसणारी काही लक्षणे आहेत. जर ही लक्षणे 4 ते 12 आठवड्यांपर्यंत दिसून येत असतील तर त्यास लक्षणे असणारा कोविड किंवा पोस्ट-एक्युट कोविड सिंड्रोम म्हणतात. जर 12 आठवड्यांपेक्षा जास्त काळ लक्षणे दिसली तर त्याला पोस्ट-कोविड सिंड्रोम असं म्हणतात.

हेही वाचा: Sputnik V: पॅनेशिया बायोटेक आणि RDIF ने सुरु केलं भारतात उत्पादन

हेही वाचा: मानसिक शांतीसाठी गाईला 'जादूची झप्पी'; मोजताहेत 15,000 रुपये

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं की, गेल्या 22 दिवसांपासून देशात ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. 3 मे रोजी देशात 17.13 टक्के ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या होती मात्र आता ती घटून 10.17 टक्के झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये ऍक्टीव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये जवळपास 10 लाखांची घट दिसून आली आहे.

वय वर्षे 45 च्या वरील लोकांना एकूण 14.56 कोटी (पहिला आणि दुसरा डोस धरुन) लस दिली गेली आहे. तर 18 ते 44 वर्षे वयादरम्यानच्या 1.06 कोटी लोकांना पहिला डोस दिला गेला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

40 दिवसांनंतर आतापर्यंतचे कमी रुग्ण

पुढे अग्रवाल यांनी म्हटलं की, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,22,000 रुग्ण सापडले आहेत. हे 40 दिवसांनंतर आतापर्यंत सर्वाधिक कमी रुग्ण आहेत. जिल्हा स्तरावर देखील कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होताना दिसून येत आहे. 3 मे पर्यंत रिकव्हरी रेट 81.7 टक्के होता मात्र आता तो वाढून 88.7 टक्के झाला आहे.

loading image