Mukesh Ambani Love Story : मुकेश अंबानींनी पत्नी नीताला सिग्नलवर केले होते प्रपोज

Mukesh Ambani Birthday: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अन् जगातील श्रीमंत व्यक्तीच्या लिस्टमध्ये येणारे मुकेश अंबानींचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957ला भारताबाहेर यमन येथे झाला होता.
Mukesh Ambani Love Story
Mukesh Ambani Love Storysakal

Mukesh Ambani Birthday: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अन् जगातील श्रीमंत व्यक्तीच्या लिस्टमध्ये येणारे मुकेश अंबानींचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957ला भारताबाहेर यमन येथे झाला होता. बिझिनेस क्षेत्रात त्यांनी आपले वर्चस्व स्थापित करत एक ओळख निर्माण केली.

अंबानी यांची व्यावसायिक आयुष्य जेवढं चर्चेत राहलं तेवढं त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असतं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची लव्ह स्टोरीही एकेकाही चर्चेचा विषय होती. होय. जरी नीता या धीरूभाई अंबानीची पसंती होत्या तरी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची लव्हस्टोरीही तितकीच इंटरेस्टींग आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Mukesh Ambani and Nita Ambani love story mukesh ambani proposed nita at traffic signal)

नीता अंबानी या डान्समध्ये पारंगत आहे. त्यांच्या याच गुणावर प्रभावित होऊन मुकेश अंबानी यांचे वडिल धीरूभाई अंबानी आणि आई कोकीलाबेन यांनी नीताला आपल्या घरची सुन बनविण्याचे ठरविले.

एके दिवशी धीरूभाई अंबानी यांनी नीता यांच्या घरी फोन करून त्यांना ऑफीसमध्ये भेटण्यास बोलावले आणि तुम्ही काय करता आणि तुला कशात आवड आहे, असे प्रश्न विचारले तेव्हा नीता म्हणाल्या मी शिक्षण घेत असून मला डान्स आणि स्वीमींगमध्ये आवड आहे.

Mukesh Ambani Love Story
Mukesh Ambani : 'या' चाळीत राहायचे मुकेश अंबानी, 100 लोकांसाठी होते चक्क एक बाथरूम

धीरूभाई यांच्या सांगण्यावरुन नीता या मुकेश अंबानी यांना भेटायला आल्या. तेव्हा पहिल्या भेटीवेळी मुकेश अंबानींनी पांढरा सदरा आणि काळा पँँट घातला होता. एवढ्या मोठ्या व्यक्तीला पाहून नीता या प्रभावित झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या भेटी होत होत्या.

एकदा अशाच एक भेटीदरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुकेश अंबानी आणि नीता हे एकत्र कारनी मुंबईच्या पेडररोडवरुन जात होते. तेव्हा त्यांची कार ट्रॅफीक सिग्नलवर थांबली तेव्हा मुकेश यांनी नीता यांना लग्नासाठी विचारले.

यावर नीता यांनी लाजून मुकेश यांना गाडी चालविण्यास सांगितले पण मुकेश यांनी जोपर्यंत यावर उत्तर देत नाही तोवर गाडी चालविणार नाही, असे स्पष्ट सांगितले. सिग्नलसुद्धा सुटला आणि त्यामुळे त्यांच्यामागीलही गाड्या थांबल्या होत्या. नीता यांनी लगेच मुकेश यांना हो म्हटले. त्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com