esakal | कोरोना संकटात मुकेश अंबानी आले मदतीला; ऑक्सिजनचा करताहेत मोफत पुरवठा!
sakal

बोलून बातमी शोधा

Mukesh Ambani

कोरोना संकटात मुकेश अंबानी आले मदतीला; ऑक्सिजनचा करताहेत मोफत पुरवठा!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अवाक्याबाहेर जात असल्याने आरोग्य सुविधा तोकड्या पडू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी हॉस्पिटलसमोर रांगा लागल्याचे दृश्य आहे, तर अनेक लोक हॉस्पिटलच्या आवारातच उपचार घेत असल्याचे चित्र आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, पण रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर सरकारचा दबाव वाढला आहे. त्यातच देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यांनी आपल्या रिफायनरीमध्ये उत्पादित होणारे ऑक्सिजन हॉस्पिटल्संना मोफतमध्ये देण्यास सुरुवात केली आहे. 'लाईव्ह हिंदुस्तान'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे पश्चिम भारतात जगातिल सर्वात मोठे रिफायनिंग कॉम्पलेक्स आहे. येथून जामनगर ते महाराष्ट्रापर्यंत मोफतमध्ये ऑक्सिजन पाठवले जात आहे. कंपनीच्या एक अधिकाऱ्याने ओळख न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. महाराष्ट्राचे शहर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, राज्याला रिलायन्सकडून 100 टन ऑक्सिजन मिळेल.

हेही वाचा: चीनचे उद्योगपती झोंग आशियातील सर्वात श्रीमंत; मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर

भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून विषाणूने थैमान घातले आहे. रुग्णांच्या वाढीमुळे केंद्र आणि राज्य सरकारांचे महामारीला हाताळण्यात आलेले अपयश पूर्णपणे दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी हॉस्पिटल बेड आणि ऑक्सिजनची कमतरता आहे. लोकांच्या मृत्यूचा आकडा वाढला आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. राजधानी मुंबईत दिवसाला 10 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. राज्यात दररोज 50 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. मुकेश अंबानी यांचे घर आणि रिलायन्सचे हेडक्वार्टर मुंबईमध्येच आहे.

अधिकाऱ्याने सांगितलं की, रिफायनरीत उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजनमधील मोठा भाग मेडिकल वापरासाठी तयार करण्यात येत असून हॉस्पिटल्सना पाठवण्यात येत आहे. असे असेल तरी कंपनीच्या प्रवक्त्त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. महाराष्ट्राने केंद्राकडे अनेकदा दुसऱ्या राज्यांच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. पण, अनेक राज्यांमध्ये कोरोनाची गंभीर स्थिती आहे. शिवाय तेथेही ऑक्सिजनची डिमांड वाढली आहे.

loading image
go to top