esakal | चीनचे उद्योगपती झोंग आशियातील सर्वात श्रीमंत; मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर
sakal

बोलून बातमी शोधा

Jhong-Shanshan

चीनमध्ये बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणारे उद्योगपती झोंग शान्शान हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार गेल्या आठवड्यात झोंग यांची एकूण मालमत्ता ८५ अब्ज डॉलर झाली आहे. झोंग हे प्रामुख्याने नोंगफू स्प्रिंग मिनरल वॉटरचा व्यवसाय करतात.

चीनचे उद्योगपती झोंग आशियातील सर्वात श्रीमंत; मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर

sakal_logo
By
पीटीआय

बीजिंग - चीनमध्ये बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणारे उद्योगपती झोंग शान्शान हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार गेल्या आठवड्यात झोंग यांची एकूण मालमत्ता ८५ अब्ज डॉलर झाली आहे. झोंग हे प्रामुख्याने नोंगफू स्प्रिंग मिनरल वॉटरचा व्यवसाय करतात. त्याचबरोबर त्यांची औषधी कंपनी वेन्टाई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्राइजकडून लस निर्मिती केली जाते. गेल्यावर्षी चीनच्या शेअर बाजारात या दोन्ही कंपन्यांचा प्रवेश झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

झोंग यांनी पत्रकारिता, मशरुमची शेती आणि आरोग्य सेवेत काम केले आहे. झोंग शान्शान यांनी १९९६ रोजी नोंगफू स्प्रिंग नावाची पाण्याची कंपनी सुरू केली होती. या कंपनीचे भांडवल आज ५.७ अब्ज डॉलरवर पोचले आहे. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार जगातील ते १७ वे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

बातमी महत्त्वाची : उन्हाळा होणार ६ महिन्याचा; वैज्ञानिकांचा गंभीर इशारा

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनल्यानंतर आता रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे दुसऱ्या स्थानावर आले आहेत. झोंग शान्शान यांची संपत्ती वाढण्यामागे कोरोना कनेक्शन आहे. त्यांनी गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात बीजिंग वेन्टाई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्राईज कंपनीने लस विकसित केली होती. त्यानंतर नोंगफू स्प्रिंग कंपनीने हॉंगकॉंगमध्ये लोकप्रियता मिळवली. त्यामुळे यावर्षी त्यांच्या संपत्तीत चांगली भर पडली. 

Edited By - Prashant Patil

loading image