कॉर्पोरेट किंवा कराराने शेती करत नाही : मुकेश अंबानी

वृत्तसंस्था
Tuesday, 5 January 2021

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने  साहाय्यक कंपनी जिओ इन्फोकॉममार्फत पंजाब व हरियाना उच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली. शेतकऱ्यांनी केलेल्या तोडफोडीला आळा घालण्याची विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.

चंडीगड - नवीन कृषी कायद्यांचा कंपनीशी काही संबंध नव्हता आणि नाही तसेच कंपनीला त्यापासून कोणतेही फायदे नाहीत. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रिलायन्स रिटेल लिमिटेड (आरआरएल), रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (आरजेआयएल) आणि रिलायन्सशी संबंधित कोणतीही अन्य कंपनी कॉर्पोरेट किंवा कराराने शेती करत नाही किंवा करवत नाही, असे स्पष्टीकरण रिलायन्स इंडस्ट्रीजने आज दिले. 

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) साहाय्यक कंपनी जिओ इन्फोकॉममार्फत पंजाब व हरियाना उच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली. शेतकऱ्यांनी केलेल्या तोडफोडीला आळा घालण्याची विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. ‘कॉर्पोरेट’ किंवा काँट्रॅक्ट शेतीसाठी रिलायन्स किंवा रिलायन्सच्या साहाय्यक कंपनीने हरियाना, पंजाब किंवा देशातील अन्य कोणत्याही भागात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जमीन खरेदी केलेली नाही. तसे करण्याची योजनाही नाही, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रिलायन्स रिटेल ही संघटित रिटेल क्षेत्रातील एक कंपनी आहे आणि वेगवेगळ्या कंपन्यांची निरनिराळी उत्पादने त्यामार्फत विकली जातात, पण ती कंपनी थेट शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करत नाही किंवा शेतकऱ्यांशी दीर्घकालीन खरेदी करारामध्ये कंपनीचा सहभाग नाही, असेही कंपनीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दंगलखोरांनी केलेली तोडफोड आणि हिंसक कारवायांनी रिलायन्सशी संबंधित हजारो कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. तसेच पायाभूत सुविधा, विक्री आणि सेवा दुकानांची रोजची कामे धोक्यात आली आहेत, असेही रिलायन्सने म्हटले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukesh Ambani Says it Will Not Enter Corporate Farming