मुकेश अंबानी श्रीमंतांमध्ये अव्वल

वृत्तसंस्था
Saturday, 12 October 2019

अब्जाधीश व संपत्ती (अब्ज डॉलरमध्ये)
१) मुकेश अंबानी ५१.४
२) गौतम अदानी १५.७
३) हिंदुजा बंधू १५.६
४) पालनजी मिस्त्री १५
५) उदय कोटक १४.८
६) शिव नाडर १४.४
७) राधाकृष्णन दमानी १४.३
८) गोदरेज समूह १२
९) लक्ष्मी मित्तल १०.५
१०) कुमार बिर्ला ९.६

‘फोर्ब्स इंडिया’च्या यादीत सलग १२ व्या वर्षी नाव
नवी दिल्ली - सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत ‘रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड’चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुन्हा एकदा सर्वोच्च स्थानी झळकले आहे. ‘फोर्ब्स इंडिया’ मासिकाने २०१९ या वर्षातील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. 

या यादीत सलग १२ व्या वर्षी अंबानी यांचा समावेश झाला आहे. ५१.४ अब्ज डॉलर संपत्तीसह त्यांनी पुन्हा प्रथम स्थान पटकाविले आहे. पायाभूत क्षेत्रातील नावाजलेले उद्योजक गौतम अदानी या वेळी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 

अझीम प्रेमजी यांची घसरण
प्रसिद्ध उद्योजक अझीम प्रेमजी यांच्या संपत्ती मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यांनी त्यांच्या संपत्तीमधील मोठा वाटा दान केला असल्याचे कारण या मागे आहे. 

नवे सहा श्रीमंत 
यादीत सहा नव्या श्रीमंतांचा समावेश झाला आहे. यात १.९१ अब्ज डॉलर मालमत्ता असणारे बिजू रवींद्रन, १.७ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह हल्दीराम ग्रुपचे मनोहरलाल ऊर्फ मधुसूदन आग्रवाल आणि स्वच्छतागृहातील साधनांसाठी लोकप्रिय ‘जग्वार’ समूहाचे राजेश मेहरा यांचा समावेश आहे.
आर्थिक मंदीमुळे या वर्षी अनेक उद्योगपतींच्या संपत्तीत घट झाल्याचे दिसून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukesh Ambani tops the list of wealthy