BJP नेत्याच्या हत्येप्रकरणी अन्सारी बंधू दोषी, १० वर्षांची शिक्षा; खासदारकी रद्द होणार?

mukhtar and afzal ansari
mukhtar and afzal ansari

लखनऊ : बहुजन समाज पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांना १६ वर्षे जुन्या गँगस्टर प्रकरणात दोषी ठरवून चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यासोबतच अफजल अन्सारी यांना कडेकोट बंदोबस्तात तुरुंगात पाठवण्यात आले.

याच प्रकरणात न्यायालयाने माफिया मुख्तार अन्सारीला देखील दहा वर्षांची शिक्षा आणि पाच लाखांचा दंड ठोठावला आहे.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर अफजल अन्सारीचे लोकसभा सदस्यत्व धोक्यात आले आहे . शिक्षा सुनावताना ते न्यायालयात हजर होते. न्यायालयाकडून दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास आमदार आणि खासदाराचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. त्याचबरोबर कायद्यानुसार अफजल अन्सारी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करू शकतात.

mukhtar and afzal ansari
Apmc Election Result : अजित पवारांची व्युव्हरचना यशस्वी ! नवीन चेहरे देऊनही राष्ट्रवादीने मिळवले वर्चस्व

२००५ मध्ये गाझीपूरमध्ये तत्कालीन भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्यासह सात जणांची मुहम्मदाबाद पोलिस स्टेशनच्या बसनिया चट्टी येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अफजल अन्सारी आणि मुख्तार अन्सारी यांच्यावर २००७ मध्ये गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गाझीपूरचे खासदार अफजल अन्सारी जामिनावर बाहेर होते.

mukhtar and afzal ansari
Traffic Jam : Long Weekend मुळं पुणे-बंगळुर महामार्ग जाम; 'या' मार्गावर काय आहे स्थिती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com