esakal | मुकुल रॉय यांची घरवापसी, तृणमूलमध्ये प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

mukul-roy

मुकुल रॉय यांची घरवापसी, तृणमूलमध्ये प्रवेश

sakal_logo
By
आशिष कदम

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करणाऱ्या मुकुल रॉय (Mukul Roy) यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या उपस्थितीत रॉय पितापुत्राने पक्षप्रवेश केला. आणखी काही नेते पक्षात परतणार, असा दावाही बॅनर्जी यांनी केला. (BJP leader Mukul Roy return to TMC)

हेही वाचा: जितिन प्रसाद यांनी जे केलं त्याविरोधात मी नाही - कपिल सिब्बल

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारासंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुकुल रॉय गैरहजर होते. तेव्हापासून रॉय भाजपाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूलमध्ये परतणार अशी चर्चा होती. अखेर शुक्रवारी मुकुल रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. तृणमूलमध्ये परतल्यानंतर मुकुल रॉय यांनी समाधान व्यक्त केले.

सद्यस्थितीत कोणीही भाजपात राहू शकणार नाही, असे मुकुल रॉय यांनी सांगितले. तर मुकुल रॉय यांचे तृणमूलमध्ये स्वागत असून त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, असे ममता बॅनर्जींनी सांगितले. मुकुल रॉय यांना भाजपाने धमकावले होते आणि याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा: तब्बल तीन तास शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये चर्चा

मुकुल रॉय यांनी दोन वर्षांपूर्वी तृणमूल काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र, त्यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये तृणमूलला सोडचिठ्ठी दिली होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. सप्टेंबर २०२० मध्ये भाजपाच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. मे २०१९ मध्ये रॉय यांचे पुत्र सुभ्रांशू यांनीदेखील प्रवेश केला होता.