esakal | काय ठरलं? तब्बल तीन तास शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

prashant kishor sharad pawar

तब्बल तीन तास शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये चर्चा

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (prashant kishor)यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीच्या (ncp) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झालीच पण त्याचबरोबर पवारांनी प्रशांत किशोर यांच्यासाठी खास भोजनाचाही कार्यक्रम ठेवला होता. (Three hours long meeting between sharad pawar & prashant kishor)

सकाळी ११ वाजता सुरु झालेली बैठक दुपारी दोन वाजता संपली. 'सिलव्हर ओक' बाहेर थांबलेल्या माध्यम प्रतिनिधींशी बोलणं दोघांनी टाळलं. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये डीएमके आणि तृणमुल काँग्रेसच्या विजयानंतर प्रशांत किशोर यांची शरद पवारांबरोबर ही पहिलीच भेट होती. विधानसभा निवडणुकीसाठी या पक्षांसाठी निवडणूक रणनिती आखण्यात प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हेही वाचा: "जिनके अपने घर शिशे के होते है..."; कोर्टाने परमबीरना सुनावलं

प्रशांत किशोर यांनी स्वत:च ते आता राजकीय रणनीतीकार नसल्याचं सांगितलं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अनेक नेते प्रशांत किशोर यांच्या संपर्कात आहेत, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. राष्ट्रवादीचे दुसरे नेते छगन भुजबळ यांनी बैठकीच्या अजेंड्याबद्दल काहीही माहित नसल्याचे सांगितले. प्रशांत किशोर हे यशस्वी राजकीय रणनीतीकार आहेत. शरद पवार त्यांचे सल्ले नक्कीच विचारात घेतील, असे छगन भुजबळ म्हणाले. प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट घेतली होती.

हेही वाचा: महाराष्ट्रातल्या 'त्या' नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली?

"शरद पवार-प्रशांत किशोर यांच्यातील भेटीचे स्वागतच आहे. देशाचा एककल्ली कारभार सुरू आहे. देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष व पर्याय आवश्यक आहे. काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचे फावले आहे. सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल" असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.