Mulayam Singh Yadav: मुलायमसिंह यादव यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक! रुग्णालयाची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akhilesh Yadav and Mulayam Singh Yadav

Mulayam Singh Yadav: मुलायमसिंह यादव यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक! रुग्णालयाची माहिती

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत ताजं मेडिकल बुलेटिन जाहीर झालं आहे. त्यानुसार, मुलायमसिंह यांची प्रकृती अद्यापही गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. (Mulayam Singh Yadav condition is still Critical says Medanta Hospital)

गुरुग्राम इथल्या मेदंता रुग्णालयात मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती अद्याप गंभीर असून त्यांना जीवरक्षक औषध दिली जात आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा: Thailand Shooting: लहान मुलांच्या 'नर्सरी'त गोळीबार; 22 चिमुकल्यांसह 34 जणांचा मृत्यू

दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून अद्याप त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. मुलायम सिंह यांच्या प्रकृतीवर डॉक्टर सतत लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा: Dasara 2022 : बाजारपेठेचे सीमोल्लंघन; दसऱ्याचा मुहूर्त साधत ग्राहकांकडून खरेदी

मुलायम सिंह यादव हे समाजवादी पार्टीचे माजी संस्थापक अध्यक्ष असून न्यायालयीन लढाईनंतर त्यांच्या पक्षाचं नेतृत्व आता त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यंमत्री अखिलेश यादव यांच्यावर आहे.