Mumbai Ahmedabad Bullet Train: जपानमधून आले रूळ; बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग आणखी भक्कम

Latest Mumbai News: रुळाच्या मजबुतीच्या मदतीने ही ट्रेन अवघ्या साडेतीन तासांत ८४४ किलोमीटरचा पल्ला गाठणार आहे.
Mumbai Ahmedabad Bullet Train: जपानमधून आले रूळ;  बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग आणखी भक्कम
Updated on

ठाणे शहर, ता. १० (बातमीदार) : गुजरातमधील देशाच्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग आणखी भक्कम होऊ लागला आहे. ताशी ३५० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी जपानमधून रेल्वे रूळ मागवण्यात आले आहेत. ते रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू झाले आहे.

यासाठी वेल्डिंग करणारी यंत्रणासुद्धा जपाननिर्मित अत्याधुनिक आहे. आतापर्यंत ६० किलोमीटरचे रूळ टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी अत्याधुनिक फ्युजन वेल्डिंग मशीनद्वारे वेल्डिंग केले जात आहे. अशा रुळाच्या मजबुतीच्या मदतीने ही ट्रेन अवघ्या साडेतीन तासांत ८४४ किलोमीटरचा पल्ला गाठणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com