मुंबईत हायअलर्ट! दिल्लीत IS दहशतवाद्याला पकडल्यानंतर पोलिस यंत्रणेला सूचना

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडून देशातील अनेक भागात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचत आहे. राम मंदिर भूमी पूजनानंतर एका महिन्याच्या आतच हा घातपात करण्याचा कट रचला असल्याचं दहशतवाद्याने म्हटलं आहे.

मुंबई - देशाची राजधानी दिल्लीत धौला कुआ भागात शुक्रवारी रात्री पोलिसांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. यामध्ये संशयित दहशतवादी अबू यूसुफला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेला अबू यूसुफ हा IS चा दहशतवादी असून देशातील वेगवेगळ्या भागात घातपाताचा कट कऱण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडून 15 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, सध्या गणेशोत्सव असून महाराष्ट्रात मुंबईमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

हायअलर्ट जारी केल्यानंतर मुंबई पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. सुरक्षा व्यवस्था कडक कऱण्यात आली असून वाहनांची तपासणी केली जात आहे. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडलेल्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं समजते.

दिल्लीत पकडण्यात आलेल्या यूसुफने पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे. त्याने सांगितलं की, इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडून देशातील अनेक भागात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचत आहे. राम मंदिर भूमी पूजनानंतर एका महिन्याच्या आतच हा घातपात करण्याचा कट रचला असल्याचं दहशतवाद्याने म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai high alert after terrorist arrest with IED in delhi