
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील वादाने पुन्हा एकदा मराठी-हिंदी भाषिकांमधील तणाव उफाळून आला आहे. मुंबईच्या मीरारोड येथील एका घटनेनंतर सुरू झालेल्या या वादाने आता राष्ट्रीय पातळीवर चर्चा घडवली आहे. दुबे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत त्यांना हिंदी शिकवल्याचा दावा केला आहे, तर ठाकरे यांनी मुंबईत मराठीचा अपमान सहन न करण्याचा इशारा दिला आहे.