आधीच खिशाला कात्री, आता पडणार भगदाड ! नव्या दरांमुळे विमान प्रवास 30 टक्क्याने महागणार

आधीच खिशाला कात्री, आता पडणार भगदाड ! नव्या दरांमुळे विमान प्रवास 30 टक्क्याने महागणार

मुंबई, ता.13: नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विमान प्रवासाचे दर वाढवण्याच्या घोषणेमुळे सध्याच्या विमान प्रवासाचे तिकीट 30 टक्क्याने महागणार आहेत. या निर्णयामुळे विमान कंपन्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला असला तरी प्रवाशाच्या खिशाला कात्री लागणार आहे. 31 मार्चपासून  नवे दर लागू होणार आहेत.

विमान प्रवासाचे किमान आणि कमाल दर 10 ते 30 टक्काने वाढवले आहेत. कोरोना काळात केंद्र सरकारने मे महिन्यात डोमेस्टिक विमानसेवा सुरू केली होती, त्यावेळची परिस्थिती बघता विमान प्रवास दर स्थिर ठेवण्याची बंधने सरकारने विमान कंपन्यांवर लादली होती. त्यामुळे विमान प्रवास तिकिटांसाठीची डायनामीक पद्धती तात्पुरती स्थगित ठेवली गेली. परिणामी विमान प्रवासाचे दर स्थिर होते.

यामध्ये 40 मिनिटापेक्षा कमी प्रवासासाठी पहिले 2000 हजार रुपये कमाल दर आकारण्यात येत होता, गुरुवारपासून तो 2,200 रुपये करण्यात आला.  किमान दर 6000 वरून 7,800 एवढा करण्यात आला आहे.

mumbai news flight tickets prices to hike by 30 percent travelers are unhappy

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com