मुंबईतले 9 विभाग अजूनही 'डेंजर झोन'मध्ये; प्रसार कमी होतोय म्हणून कोरोनाला हलक्यात घेऊ नका

मुंबईतले 9 विभाग अजूनही 'डेंजर झोन'मध्ये; प्रसार कमी होतोय म्हणून कोरोनाला हलक्यात घेऊ नका

मुंबई, ता. 13 : कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी मुंबईतील 9 विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. शहराच्या सरासरीपेक्षा मुंबईतील या विभागांत कोरोना रुग्णांमध्ये 0.13 टक्के वाढ झाली आहे. एफ उत्तर , एम पश्चिम , एल , आर मध्य , आर पश्चिम , पी उत्तर , के पश्चिम , टी , एस या विभागांत अधिक रुग्णसंख्या आहे.

पूर्व उपनगरामधील 5, पश्चिमेकडील 3 आणि 1 मध्य मुंबईतील हे प्रभाग आहेत. या प्रभागांत  0.14 टक्के ते 0.21 टक्क्याचा विकास दर नोंदवला गेला. महत्त्वाचे म्हणजे रुग्ण प्रामुख्यानं झोपडपट्टी नसलेल्या भागातील आहे.

मुंबईतील मध्यवर्ती परिसर असणाऱ्या टिळक नगर, मुलुंड, कुर्ल्यातील नेहरू नगर, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप या भागात बहुतांश रुग्ण आढळत आहेत. तर पश्चिम उपनगरात वांद्रे, खार, अंधेरी आणि जोगेश्वरी (पूर्व) इथून देखील अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

मध्य मुंबईतील एफ-उत्तर मध्ये रुग्णवाढ होत असल्याचे दिसत असून (0.15%) असून त्यात माटुंगा आणि धारावीचा समावेश आहे. बाजारपेठा, लोकांची गर्दी, सुरू झालेली लोकल, बसेस यामुळे  रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसते. 

चेंबूर आणि टिळक नगरचा समावेश असलेल्या एम पश्चिम प्रभागात देखील रुग्णवाढ दिसत असून सध्याचा रुग्ण वाढीचा दर 0.21 टक्के आहे. या प्रभागातील दररोजच्या सरासरी तपासणी दुप्पट झाली आहे. तर एल वॉर्ड (कुर्ला) इथं तिसऱ्या क्रमांकाचा विकास दर (0.17% ) आहे.

मुंबईतील ज्या प्रभागांमध्ये रुग्ण वाढ होत आहे तेथे 80 टक्के रुग्ण हे उच्च लोकवस्तीतील आहे. यातील बहुतेक रुग्णांना प्रवासाचा इतिहास आहे. त्याचप्रमाणे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन ही होत असल्याचे दिसत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र जाधव यांनी सांगितलं.

महत्त्वाची बातमी : येत्या काळात कोणतंही संकट आलं तरी मुंबईतील 'हे' रुग्णालय आहे सज्ज; काय आहे तयारी, कोणतं आहे रुग्णालय?

मुंबईत होत असलेली रुग्णवाढ ही फार मोठी नाही. त्यामुळे कोणताही धोका आहे असे दिसत नाही. तरी आम्ही अधिकाधिक चाचण्यांवर भर देत आहोत. पर राज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांची चाचण्या तसेच तपासण्यांवर ही भर देण्यात येत आहे असं मुंबई महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणालेत. 

mumbai news nine wards from mumbai are still in dander zone as covid count not decreasing

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com