
मुंबई : 'INS करंज' ही नवी घातक पाणबुडी उद्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. मात्र त्याआधी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ला एअर इंडिपेंडेंट प्रोप्लशन (AIP) सिस्टिम विकसित करण्यात महत्त्वपूर्ण यश मिळालं आहे. सोमवारी रात्री AIP सिस्टिमची करण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली. या सिस्टिममुळे भारतीय पाणबुडया अधिक घातक होणार आहेत. AIP सिस्टिममुळे पाणबुडीची मारकक्षमता अधिक प्रभावी होणारच आहे. पण त्याचबरोबर पाणबुडी जास्तकाळ पाण्याखाली राहू शकते.
कलवरी वर्गातील सर्व पाणबुड्यांना AIP सिस्टिमने सज्ज करण्याची भारतीय नौदलाची योजना आहे. २०२३ मध्ये कलवरी वर्गातील पाणबुडीच्या पहिल्या दुरुस्तीवेळी ही सिस्टिम बसवण्यात येऊ शकते. फ्रान्समधील कंपनीच्या मदतीने माझागाव डॉकयार्डमध्ये १६१५ टन वजनाच्या कलवरी वर्गातील पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे. 'INS करंज' याच वर्गातील तिसरी पाणबुडी आहे. उद्या या पाणबुडीचे जलावतारण होईल. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
पंतप्रधान मोदींचे आत्मनिर्भर भारताचे जे उदिद्ष्ट आहे, त्या दृष्टीने AIP टेक्नोलॉजीचा विकास ही महत्त्वपूर्ण बाब आहे. सध्या फक्त अमेरिका, फ्रान्स, चीन, यूके आणि रशिया याच देशांकडे ही टेक्नोलॉजी आहे. डीआरडीओची AIP टेक्नोलॉजी फॉस्फोरिक अॅसिड फ्युल सेलवर आधारीत आहे. कलवरी वर्गातील शेवटच्या दोन पाणबुडया याच तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात येणार आहेत. सोमवारी रात्री मुंबईत जमिनीवर या AIP डिझाईनची चाचणी घेण्यात आली. ही शेवटची चाचणी होती.
AIP सिस्टिममुळे पाणबुडीला वातावरणातील ऑक्सिजनची आवश्यकता भासणार नाही. एआयपी सिस्टिम असलेल्या पाणबुडीला बॅटरी चार्ज करण्यासाठी समुद्राच्या पुष्ठभागावर येण्याची आवश्यकता नाही. बराचकाळ ही पाणबुडी पाण्याखाली राहू शकते.
महत्त्वाची बातमी : मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी SIT, गृहमंत्र्यांची घोषणा
अण्विक पाणबुडीत इंजिनचे तापमान मेंन्टेन करण्याच्या प्रक्रियेमध्ये आवाज होत असतो. त्यामुळे दूरवर असलेला शत्रू सुद्धा सतर्क होऊ शकतो. पण AIP सिस्टिमने सुसज्ज असलेल्या पाणबुडया आवाज करत नाहीत. त्यामुळे शत्रूवर घातक प्रहार करता येऊ शकतो. या नव्या सिस्टिममुळे भारतीय पाणबुड्यांची क्षमता अधिक घातक होणार आहे. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी पाकिस्तान जोरदार प्रयत्न करत आहे. पण फ्रान्सने पाकिस्तानला अगोस्टा ९० बी वर्गाच्या पाणबुडीसाठी हे तंत्रज्ञान नाकारले. त्यामुळे पाकिस्तानला आता चीन किंवा टर्कीकडे जाण्याशिवाय पर्याय नाही.
mumbai news good news by DRDO before the launch of INS karanj
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.