भारतातील कुपोषणाचा रिपोर्ट धक्कादायक ! राष्ट्रीय पोषण आहार सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आली समोर

भारतातील कुपोषणाचा रिपोर्ट धक्कादायक ! राष्ट्रीय पोषण आहार सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आली समोर

मुंबई, 18 : भारतातील 14 टक्के लोकसंख्या अर्धपोषित आणि 5 वर्षांखालील 13 दशलक्ष मुले तीव्र कुपोषणाने ग्रस्त असल्याचा अहवाल राष्ट्रीय पोषण आहार सर्वेक्षणाने दिला आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक पंचमांश लोकसंख्या ही भारताची असून देशातील आरोग्य आणि पोषण आहार या गोष्टी त्यामुळेच अत्यंत महत्वाच्या ठरतात. केंद्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या राष्ट्रीय पोषण आहार सर्वेक्षणातून पुढे आलेली आकडेवारी त्यामुळेच डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.

भारताची गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक वृद्धी जरी प्रभावी झाली असली तरी आजही देशाची 14 टक्के लोकसंख्या ही अर्धपोषित आहे. देशातील 5 वर्षे वयाखालील 30% मुलेही वाढ खुंटलेली असून 50% पेक्षा अधिक मुले, मुली आणि महिला या अशक्त (अॅनेमिक) आहे.

अर्धपोषित असण्याच्या समस्येबरोबरच खाण्याच्या आणि जीवनशैलीमधील बदलांमुळे त्यांच्यात लठ्ठपणा आला असून त्यामुळे कर्करोग, हृदयरोग आणि टाईप-2 मधुमेह यांसारख्या रोगांचे धोके संभवतात. अंदाज असा आहे की, 19 टक्के पुरुष आणि 21 टक्के महिला या लठ्ठपणाने त्रस्त असून 73 दशलक्ष लोक हे मधुमेहाने ग्रस्त आहेत.

“कोविड 19 साथरोगाने आपल्या सर्वांनाच ग्रासले असून अन्न आणि रोगप्रतिकारक शक्ती या गोष्टी या संसर्गापासून वाचवू शकतात. येथे आतड्यांचे काम महत्वाचे असते कारण त्याद्वारे अन्नपचन व्यवस्थित होवू शकते आणि अन्नातून आलेले पोषक पदार्थ आतड्याद्वारे शरीरात पोहोचतात. मात्र, एवढा महत्वाचा अवयव असूनही निम्मी लोकसंख्या आतड्यांच्या आरोग्याकडे डोळेझाक करते.

पोषक आहार आणि आतड्यांचे आरोग्य यात महत्वाचा संबंध आहे हेच आपण विसरतो. आतड्याच्या आरोग्य आणि कामामध्ये त्यातील जीवाणूची कामगिरी फार मोठी असते. मोठ्या प्रमाणावरील चांगल्या जीवाणूमुळे आतडी सुरक्षित राहतात”, असेही डॉ. नीरजा हाजेला म्हणाल्या.    

देशातील 5 वर्षे वयाखालील 13 दशलक्ष मुले ही अत्यंत टोकाच्या कुपोषणाला सामोरी जातात तर त्यातील 1-2 दशलक्ष मुले मृत्यू पावतात. त्यांच्या आतड्याची स्थिती खराब असते आणि त्यांच्या पचनशक्तीवर परिणाम झालेला असतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, काही प्रोबायोटिक्स हगवणीचे प्रमाण कमी करू शकतात आणि त्याद्वारे व्हीटॅमीन व खनिजांचे होणारे नुकसान टळते. गरोदर महिलांना सर्वाधिक पोषण आहार लागतो. पण, त्यांनाच तो कमी मिळतो. त्यांची पचनशक्ती कित्येकदा कमकुवत असते आणि त्यातून त्यांना लोह, झिंक, फॉलिक ऍसिड व आयोडीन यांची कमतरता जाणवते. त्यातून मग वेळेआधीच बालकांचा जन्म होतो आणि त्यांचे वजन कमी भरते. अभ्यासातून असेही दिसून आले आहे की, प्रोबायोटिक्स गरोदर महिलांचे एकूण आरोग्य सुधारू शकतात.

mumbai news malnourishment index report of reviled dangerous information about india

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com