Tue, Sept 26, 2023

Mumbai: चोरीच्या फोनद्वारे दहशतवादी कारवाया? मुंबई क्राईम ब्रॅंचचा गौप्यस्फोट
Published on : 6 September 2022, 9:17 am
भारतात चोरी झालेले फोन दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरण्यात येतो अशी शक्यता आहे. भारतातून जे मोबाईल फोन चोरले जातात ते पुढे दहशतवादी कारवायासाठी वापरले जातात. भारतातून चोरी झालेले फोन बांग्लादेशमार्गे पाकिस्तानात पाठवले जातात. चोरी केलेले फोन हे डी कंपनीद्वारे दहशतवाद्यांना पुरवले जातात. मुंबई क्राईम ब्रॅंचने याबाबत माहिती दिली आहे.
आयोजित एका बैठकीत सर्व सुरक्षा यंत्रणेतील मुख्य अधिकारी उपस्थित होते. देशाच्या सुरक्षेबाबत काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचा यामध्ये समावेश होता. यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये माहिती देताना सांगितले की, चोरी झालेल्या मोबाईल फोनचे IMEI नंबर बदलून ते या कारवाया करण्यासाठी वापरले जातात.