बुलीबाई ॲप प्रकरण: तीन आरोपींचा जामीन फेटाळला

सध्या हे तिन्ही आरोपी न्यायलयीन कोठडीत
Bulli Bai App
Bulli Bai Appटिम ई सकाळ

राज्यात बुलीबाई ॲप प्रकरण खुप गाजतेय. आज या प्रकरणातील आणखी एका आरोपीला ओडिशातून अटक करण्यात आली आहे. बुलीबाई ॲप प्रकरणातील तीन आरोपी विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयंक रावत यांनी केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली असून दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवार पर्यंत निकाल राखून ठेवला होता मात्र आज मुंबईतील बांद्रा न्यायालयाने या तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. सध्या हे तिन्ही आरोपी न्यायलयीन कोठडीत आहे.

Bulli Bai App
लसीकरण मोहिमेत १६० कोटींचा टप्पा पार; आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुस्लिम समाजातील महिलांबाबत आक्षेपार्ह तपशील या बुलीबाई ॲपमध्ये आहे. ॲपची निर्मिती आपण केल्याची कबुली या आरोपींनी दिली होती. यात शीख समुदायांच्या नावाने अकाऊंटस् तयार करून मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात येत होते. त्यामुळे दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हे सगळे घडवून आणत असावे का, या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com