प्रेयसीच्या अंगणात गाडला प्रियकराचा मृतदेह; अनैतिक संबंधातून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder through an immoral relationship

प्रेयसीच्या अंगणात गाडला प्रियकराचा मृतदेह; अनैतिक संबंधातून खून

अनैतिक संबंधातून सुवर्ण व्यावसायिक शिवव्रत कुमार (२३, रा. रोसाडा, लक्ष्मीपूर मोहल्ला) याची गळ्यात फास घालून हत्या (Murder) करण्यात आली होती. तो १४ मेपासून बेपत्ता होता. पोलिसांनी चौकशीअंती हसनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहिउद्दीनपूर येथील घरातून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिला रौनक खातून आणि पती मोहम्मद शहाजहान अटक केली आहे. ही घटना बिहारमधील समस्तीपूर येथे घडली. (Murder through an immoral relationship)

मृताच्या भावाने पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये १४ मे रोजीच्या सायंकाळपासून शिवव्रत भेटत नसल्याचे सांगण्यात आले होते. गुन्हा दाखल करताना रौनक खातूनवर शंका व्यक्त करण्यात आली होती. यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी रौनक खातून हिला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत रौनक खातूनने खुनाची (Murder) कबुली दिली.

हेही वाचा: लग्नात मिळालेल्या ‘टेडी बिअर’मध्ये स्फोट; तरुणाची प्रकृती चिंताजनक

तिच्या सांगण्यावरून पोलिस घरी पोहोचले. तिने सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम केले असता अंगणात शिवव्रत कुमारचा गाडलेला मृतदेह आढळला. हत्येचा पुरावा लपविण्यासाठी मृतदेह अंगणात पुरून त्यावर लाकडे ठेवली होती. मृताची जीभ आणि डोळा बाहेर निघाले होते. प्रेमप्रकरणातून (immoral relationship) सुवर्ण व्यावसायिकाची हत्या करण्यात आली, असे रोसदा पोलिस ठाण्याचे प्रमुख रामशिष कामती यांनी सांगितले.

अटकेत असलेली महिला रौनक खातून व शिवव्रत कुमार यांचे अनैतिक प्रेमसंबंध (immoral relationship) होते. यातूनच त्याची हत्या करण्यात आली. महिला रौनक खातून आणि पती मोहम्मद शहाजहानला ताब्यात घेऊन पोलिस अधिक चौकशी करीत आहे. तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Web Title: Murder Through An Immoral Relationship Body Of The Beloved Buried In The Courtyard Of The Beloved Bihar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top