NCW team listens to victims in Murshidabad; BSF camp demanded for safety amid ongoing violence.Sakal
देश
Kolkata: सीमा सुरक्षा दलाची छावणी उभारा: राष्ट्रीय महिला आयोगाच्या शिष्टमंडळाकडे पीडितांची मागणी; मुर्शिदाबाद हिंसाचार
जिल्ह्यातील काही निवडक भागांमध्ये कायमस्वरूपी सीमा सुरक्षा दलाच्या छावण्या स्थापन करण्याची तसेच दंगलींची एनआयए चौकशीची मागणी केली. या दंगलीत तीन लोकांचा मृत्यू झाला. यावेळी स्थानिकांनी फलकेही झळकावली.
कोलकता : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त भागातील लोकांची भेट घेतली व त्यांना भविष्यात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करेल, असे आश्वासन दिले. यावेळी हिंसाचारग्रस्त नागरिकांनी सीमा सुरक्षा दलाची छावणी उभारण्याची मागणी केली.