
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जगभरातून लाखो लोक येत आहेत. भारताव्यतिरिक्त परदेशातूनही यात्रेकरू आणि साधू येथे येत असतात. दरवर्षीप्रमाणे या वेळीही अनेक संतांनी आपले तंबू ठोकले आहेत. प्रमुख संतांपैकी एक म्हणजे आत्मा प्रेम गिरी महाराज. हे संत त्यांच्या उंची आणि शरीरयष्टीमुळे 'मस्क्युलर बाबा' या नावानेही प्रसिद्ध झाले आहेत.