पंतप्रधान मोदींची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; सुप्रसिद्ध संगीतकाराच्या वक्तव्यानं नवा वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Babasaheb Ambedkar Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केल्याने वाद निर्माण झालाय.

पंतप्रधान मोदींची डॉ. आंबेडकरांशी तुलना; संगीतकाराच्या वक्तव्यानं नवा वाद

सुप्रसिद्ध संगीतकार इलाय राजा (Musician Ilayaraja) यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तुलना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्याशी केल्यानं वाद निर्माण झालाय. इलाय राजा यांना भाजपतर्फे राज्यसभेवर नियुक्त केलं जाण्याची शक्यता असून त्यांच्या वक्तव्याकडं या दृष्टिकोनातूनही पाहिलं जात आहे. दिल्लीस्थित ब्ल्यूक्राफ्ट डिजिटल फाऊंडेशननं ‘आंबेडकर अ‍ॅण्ड मोदी - रिफॉर्मर्स आयडियाज, परफॉर्मर्स इम्लिमेनटेशन्स’ (Ambedkar & Modi - Reformers Ideas, Performer Implements) हे पुस्तक प्रसिद्ध केलं असून त्याच्या प्रस्तावनेत इलाय राजांनी ही तुलना केलीय. त्यांच्या या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झालाय.

इलाय राजांनी म्हंटलंय, सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातील लोक ज्या आव्हानांचा सामना करतात, त्यांच्यावर या दोन्ही तेजस्वी व्यक्तिमत्वांनी यशस्वीरित्या मात केलीय. या दोघांनीही गरीबी आणि विषम सामाजिक स्थिती जवळून पाहिली आणि ती नष्ट करण्यासाठी कार्य केलं. हे दोघंही व्यवहार्य दृष्टीचे असून त्यांनी केवळ सैद्धांतिक मांडणी करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्व दिलंय, असं इलाय राजांनी सांगितलंय.

हेही वाचा: ..तर भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागेल : पृथ्वीराज चव्हाण

डाव्या विचारसणीच्या कार्यकर्त्यांनी इलाय राजा हे ‘संघी’ असल्याची टीका केलीय. पण, राजा यांना कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नसून त्यांच्यावर होणारी ही टीका अन्यायकारक आहे, असं त्यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई म्हणाले, इलाय राजा यांच्यावर टीका करणारे हे सत्तेचे दलाल आहेत. द्रमुकनं तयार केलेलं हे वातावरण इलाय राजा यांचा आवाज दडपून टाकू शकत नाही, असं त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलंय.

Web Title: Musician Ilayaraja Compared Babasaheb Ambedkar To Pm Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top