Muskan Case
esakal
मुस्कानने मेरठ वैद्यकीय महाविद्यालयात मुलीस जन्म दिल्यानंतर दोघींना तुरुंगात हलवण्यात आले.
सौरभ राजपूत कुटुंबीयांनी नवजात राधाच्या डीएनए चाचणीची मागणी केली आहे.
मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलवर सौरभचा निर्घृण खून करून मृतदेह ड्रममध्ये भरल्याचा आरोप आहे.
लखनौ : पती सौरभ राजपूत याच्या हत्येप्रकरणी (Muskan Case) तुरुंगात असलेल्या मुस्कानने अलीकडेच मुलीला जन्म दिला असून, तिची आणि नवजात बालिकेची रवानगी मेरठ तुरुंगातील बॅरक क्रमांक १२ ए मध्ये करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी मुस्कानने तिचा प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने पतीचा खून केला होता. हत्येच्या वेळी (Saurabh Rajput Killed) ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले होते.