मुस्लिम कुटुंबातील बाळाचे नाव 'नरेंद्र दामोदरदास मोदी' 

मुस्लिम कुटुंबातील बाळाचे नाव 'नरेंद्र दामोदरदास मोदी' 

गोंडा (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मोठे यश मिळविले. यामुळे मोदी यांच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस वरच जात असल्याचे दिसत आहे. मोदी यांच्या वलयाचा प्रभाव गोंडा येथील मुस्लिम कुटुंबावरही पडला असून, त्यांनी घरातील नवजात शिशूचे नाव "नरेंद्र दामोदरदास मोदी' असे ठेवले आहे. 

लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्याने मोदीसमर्थकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. यामुळेच निकाल जाहीर झाल्यानंतर काही जणांनी मोफत चहा वाटप केले, तर काही जणांनी शेवभाजीचे पार्सल, वडापावचे मोफत वाटप केले. एका पेट्रोलपंपचालकाने तर रिक्षांना मोफत इंधन पुरविले. यामध्ये गोंडा जिल्ह्यातील वजीरगंजमध्ये मोदींचा विजय अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. निकालाच्या दिवशी म्हणजे 23 मे रोजी येथील रहिवासी मोहम्मद इरदीस याच्या घरात पुत्रजन्म झाला.

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी बाळाचे नामकरण करायचे होते. त्या वेळी बाळाची आई मैनाज बेगम हिने "नरेंद्र दामोदरदास मोदी' असे नाव ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे सासरच्या मंडळींना धक्काच बसला. त्यांनी सुनेच्या प्रस्तावावर नापसंती व्यक्त केली. मैनाजने दुबईत नोकरी करीत असलेल्या पती मुस्ताक अहमदला मोबाईल फोनवरून संपर्क साधत परवानगी घेतली. यानंतर या कुटुंबाने बाळाचे नाव "नरेंद्र दामोदरदास मोदी' असे ठेवले. जन्मदाखल्यासाठी तिने या नावाची नोंदणी केली आहे. 

मोदी यांच्याबद्दल मला वैयक्तिक पातळीवर आदर आहे. बाळाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय कौटुंबिक आहे. त्यात समाज दखल देऊ शकत नाही. 

- मोहम्मद इरदीस, मैनाजचे सासरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com