Jantar Mantar : वक्फ सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर मुस्लिम संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले. कायदा मागे न घेतल्यास आणखी मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : बहुचर्चित वक्फ सुधारणा कायद्याविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमीयत उलेमा ए हिंद, जमात ए इस्लामी आदी संघटनांनी सोमवारी जंतरमंतरवर तीव्र आंदोलन केले.