
Muslims Changed Names Marathi News : उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका गावातील अनेक मुस्लिम कुटुंबांनी आपले पूर्वज हिंदू असल्याचे सांगत दुबे, पांडे किंवा तिवारी अशी आडनावे वापरण्यास सुरुवात केली आहे. ‘विशाल भारत’ या संस्थेच्या पुढाकारातून राबविलेल्या मोहिमेतून हे आडनाव परिवर्तन करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल प्रांतात धार्मिक संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. ही संस्था येथील रहिवाशांना त्यांच्या मूळ कुळांशी-घराण्याशी जोडण्यासाठी प्रोत्साहित करत असते.