esakal | माझे पप्पा कॉलेजात माझे ज्युनिअर
sakal

बोलून बातमी शोधा

माझे पप्पा कॉलेजात माझे ज्युनिअर

शिक्षणासाठी वय लागत नाही असे म्हणतात, ते आता खरं असल्याचे दिसत आहे. कारण एका 58 वर्षीय व्यक्तीने तब्बल 40 वर्षांनंतर शिक्षण घेण्याचे ठरविले आहे. यातील विशेष बाब म्हणजे ही व्यक्ती ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.

माझे पप्पा कॉलेजात माझे ज्युनिअर

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : शिक्षणासाठी वय लागत नाही असे म्हणतात, ते आता खरं असल्याचे दिसत आहे. कारण एका 58 वर्षीय व्यक्तीने तब्बल 40 वर्षांनंतर शिक्षण घेण्याचे ठरविले आहे. यातील विशेष बाब म्हणजे ही व्यक्ती ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. त्याच कॉलेजमध्ये त्यांची मुलगीही शिक्षण घेत आहे. पण ती मुलगी आहे त्यांच्यापेक्षा सिनिअर वर्गात शिकणारी.

राजेश वोरा असे त्यांचे नाव. ते मुंबई येथील रहिवासी आहेत. त्यांना तीन मुले आहेत. राजेश यांना लहानपणापासूनच विधीचे (लॉ) शिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र, त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना त्यांचे पुढील शिक्षण घेता आले नाही. त्यानंतर त्यांनी आपले उर्वरित शिक्षण पूर्ण करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी वकिलीसाठी कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला. शिक्षणही सुरु केले. त्यांनी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्याच कॉलेजमध्ये त्यांची मुलगी ध्रुवी शिक्षण घेत आहे. ध्रुवी सध्या त्यांच्यापेक्षा सिनिअर क्लासमध्ये शिकत आहे. 

याबाबत ध्रुवी म्हणाली, ''तुम्ही विश्वास ठेवा अथवा नको, माझे वडील आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. ते सध्या माझे ज्युनिअर आहेत. आम्ही दोघे कॉलेजमध्ये खूप मजा करतो. आम्ही प्राध्यापक, वर्गमित्र तसेच असाइनमेंट्सबाबतही नेहमी बोलत असतो. इतकेच नाहीतर जेव्हा ब्रेक असतो तेव्हा माझे वडील माझ्या मित्र-मैत्रिणींसोबतही गप्पा मारतात''.  

राजेश वोरा म्हणाले, ''जेव्हा मी माझे शिक्षण पूर्ण करण्याचे ठरविले. तेव्हा मला समजले की हे एकप्रकारे आव्हानच आहे. लोकांना हे कितीपत योग्य वाटेल हे मला ठाऊक होते. पण हे काहीतरी वेगळं असंच होतं. मात्र, माझ्या कुटुंबियांनी दिलेल्या पाठिंब्याने मी पुढे जाऊ शकलो''.

loading image