Nirbhaya Case : दोषी म्हणतो, 'माझी मानसिक स्थिती ठिक नाही'

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

- विनय शर्माची मानसिक स्थिती ठिक नाही

- मानसिकदृष्ट्या खचला.

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींकडून फाशी टाळता यावी, यासाठी याचिका दाखल केली जात आहे. यातील दोषी विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडून दया याचिका फेटाळून लावल्यानंतर यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच त्याने माझी मानसिक स्थिती ठिक नसल्याचे सांगत फाशीची शिक्षा रद्द करावी, अशी मागणी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्वोच्च न्यायालयाने विनय शर्माची याचिका फेटाळून लावली होती. मात्र, त्याविरोधात दोषी विनय शर्मा याने न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. तर दुसरीकडे विनयच्या वकिलांनी फाशी टाळण्यासाठी विविध पर्याय अवलंबले आहेत. विनयच्या वकिलाने सांगितले, की विनय शर्माची मानसिक स्थिती ठिक नाही. मानसिकदृष्ट्या खचल्याने विनय मानसिक आजारातून जात आहेत. त्यामुळे त्याला फाशी दिली जाऊ शकत नाही. 

तसेच वकील ए. पी. सिंह यांनी सांगितले, की विनयला अनेकदा तुरुंगात पाठवण्यात आले. त्याच्यावर उपचारही सुरु आहेत. विनय शर्माला फाशी ही आर्टिकल 21 चे हनन आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My Mental Condition Not Good says Nirbhaya Case Convicts Vinay Sharma