
माझा पक्ष अत्यंत 'कडक'! पार्थ चॅटर्जींच्या हकालपट्टीनंतर ममतांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली - West Bengal SSC Scam : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पार्थ चॅटर्जी यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रीपदावरून हटवले आहे. ईडीच्या अटकेनंतर पार्थ चॅटर्जी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. चॅटर्जी यांची हकालपट्टी केल्यानंतर ममता यांची प्रतिक्रिया आली असून त्यांनी तृणमूल काँग्रेसमधील शिस्तीविषयी स्पष्टीकरण दिलं. (Mamata Banergy news in Marathi)
हेही वाचा: चिंता नाही! युरोपमध्ये थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्सचे व्हेरियंट वेगळं : ICMR
ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी म्हटलं की, पार्थ चॅटर्जी यांना सर्व मंत्रालयांमधून काढून टाकले आहे. माझा तृणमूल काँग्रेस पक्ष “अत्यंत कडक” आहे. चॅटर्जी शिक्षणमंत्री असताना शिक्षक भरतीत झालेल्या अनियमिततेबाबत ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी पार्थ चॅटर्जींना काढून टाकलं, कारण माझा पक्ष अतिशय कडक पक्ष आहे. जर कोणाला वाटत असेल की ते माझ्या पक्षाची प्रतिमा खराब करू शकत असेल तर ते चुकीचे आहेत.
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून विरोधकांच्या टीकेनंतर ममतांनी गुरुवारी पार्थ चॅटर्जी यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी केली. त्यांच्याकडे उद्योग, वाणिज्य आणि उपक्रम मंत्रालय अशी तीन पोर्टफोलिओ होती. आता ही तिन्ही मंत्रालये ममता यांच्याकडे आहे.
पार्थ चॅटर्जी हे पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीला सामोरे जात आहेत. ते सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीने गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली होती. ज्यात पार्थ यांच्या जवळच्या सहकारी - अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून 21.90 कोटी रुपये रोख, 56 लाख रुपये विदेशी चलन आणि 76 लाख रुपये किमतीचे सोने सापडले होते. ही बेहिशोबी संपत्ती मिळाल्यानंतर चॅटर्जी आणि अर्पिता यांना अटक करण्यात आली.
Web Title: My Party Is Very Strict Says Mamata Banerjee
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..