

gadpahara fort treasure
Sakal
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्याला ऐतिहासिक वारशाची मोठी पार्श्वभूमी लाभलेली आहे. या भागात असलेल्या 'गडपहरा' किल्ल्याला 'जुना सागर' म्हणूनही ओळखले जाते, जिथे शेकडो वर्षे रजवाड्यांचे (दांगी राजांचे) शासन होते. या किल्ल्याच्या बाहेरील एका टेकडीवर सुमारे ४०० वर्षे जुने ऐतिहासिक हनुमान मंदिर आहे. या मंदिराशी आणि किल्ल्याशी जोडलेली 'स्वप्नांच्या खजिन्याची' (Treasure) एक गूढ कथा संपूर्ण परिसरात अत्यंत लोकप्रिय आहे.