esakal | आंध्रप्रदेशात शेकडो लोक आजारी पडण्यामागचं रहस्य उलगडलं; धक्कादायक माहिती समोर
sakal

बोलून बातमी शोधा

Mystery disease1

आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एलुरूमध्ये अज्ञात आजारामुळे काही लोक आजारी पडल्याचे निदर्शनास आले होते.

आंध्रप्रदेशात शेकडो लोक आजारी पडण्यामागचं रहस्य उलगडलं; धक्कादायक माहिती समोर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

इलूरू- आंध्रप्रदेशात शेकडो लोकांना आजारी पाडणाऱ्या संशयास्पद संसर्गामागे पेयजल आणि दुधामधील लीड आणि निकेल हे रासायनिक घटक कारणीभूत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. दिल्लीतील एम्स आणि अन्य केंद्रीय संस्थांनी केलेल्या प्राथमिक पाहणीतून ही बाब उघड झाली आहे. याबाबतचा अहवाल आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांना मंगळवारी सादर केला. हा आजार उघड झाल्यानंतर रुग्णांचे काही नमुने घेण्यात आले होते, त्यात हे रासायनिक घटक आढळून आल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एलुरूमध्ये अज्ञात आजारामुळे काही लोक आजारी पडल्याचे निदर्शनास आले होते. रुग्णांना एलुरूच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केलेल्या सर्वांना चक्कर येणे, डोकेदुखी आणि अपस्मार यासारखी लक्षणे दिसत होती. अनेकांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले होते.

सतीश चव्हाण यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ; मुख्यमंत्री ठाकरे,...

रुग्णांचे रक्ताचे तसेच खाण्या-पिण्याचे नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सर्व रुग्णांचे सीटी स्कॅन आणि एक्सरे अहवाल सामान्य असल्याचं समोर आलं होतं. ही लक्षणे आढळून आलेले रुग्ण विविध भागांतील होते. त्यांचा एकमेकांशी संपर्कही आलेला नव्हता. तसेच रुग्ण वेगवेगळ्या वयोगटातील होते. खबरदारी म्हणून विजयवाडा येथे एक आपत्कालीन मेडिकेयर सेंटरही सुरु करण्यात आले होते. परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मुख्यमंत्र्यांची याची गंभीर दखल घेऊन दिल्लीच्या वैद्यकीय टिमला पाचारण केले. 

घाबरण्याचे कारण नाही

आरोग्यमंत्री अल्ला नानी यांनी रविवारी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली होती. सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. लोकांच्या जीवाला कोणताही धोका नाही आणि लोकांनी याबाबत जास्त विचार करु नये. कारण सरकार सर्व आवश्यक ते पाऊलं उचलत आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी स्वत: या स्थितीकडे लक्ष ठेवून आहेत, असं ते म्हणाले होते. 
 

loading image