Four Family Members Found Dead : कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. याठिकाणी एकाच कुटुंबातील चार जण मृतअवस्थेत आढळून आले आहेत. यामध्ये एका वृद्ध महिलेसह १५ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. याठिकाणी पोलिसांना सुसाईड नोटही मिळाली आहे. ज्यामध्ये आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या घटेननं परिसरात खळबळ उडाली आहे.