'नागालँडचे लोक माणूस मारुन खातात...? मंत्र्याने दिले मजेशीर उत्तर

नागालँड भाजप अध्यक्ष तेमजेन इमना अलांग यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
bjp leader temjen imna alongs
bjp leader temjen imna alongsesakal

नागालँड भाजप अध्यक्ष तेमजेन इमना अलांग यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत. 1999 मध्ये दिल्लीला आल्याचा एक मजेशीर त्यांनी सांगितला आहे.(nagaland kill and eat people bjp leader temjen imna alongs video goes viral)

तेमजेन हे सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तेमजेन इमना अलाँग यांनी 13 जुलै रोजी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये नागालँडमधील विविध खाद्यपदार्थ, जुन्या दिल्ली स्टेशनवर येण्याचा अनुभव अशा अनेक गोष्टींना त्यांनी उजाळा दिला आहे.(temjen imna along)

bjp leader temjen imna alongs
शिरच्छेद केलेल्या सात गायींचे मृतदेह सापडले; वाद निर्माण करण्याचा प्रयत्न?

'मी जेव्हा 1999 मध्ये पहिल्यांदा दिल्लीला आलो, जेव्हा आम्ही जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर उतरलो होतो. तेव्हा आम्हाला आमच्या नागालँड राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या इथे दिसली.' इतकी लोकं पाहून आम्ही आश्चर्यचकीत झालो. तेव्हा लोक म्हणायचे नागालँड कुठे आहे? तिथे जाण्यासाठी व्हिसाची गरज आहे का? नागा लोक माणसाला खातात का? नागालँडबद्दल चुकीची माहिती पसरवली जायची. यावेळी माझ्या उंची आणि शरिरयष्टीवरुन या लोकांनी विश्वास ठेवला असेल. असे मजेशीर उत्तर तेमजेन यांनी दिले.

तसेच, आम्ही दिसायला वेगळे आहोत, आमचे खाण्याचे पदार्थ वेगळे आहेत, विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. 50 वर्षांपासून त्याच पद्धतीने राहत आलो आहोत.' असेही त्यांनी यावेळी सांगितले.

bjp leader temjen imna alongs
अशोकस्तंभाचा वाद : मूळ चिन्ह बनवणारे डिझायनर प्राणिसंग्रहालयात का गेले?

तसेच लहान डोळे असण्यावरही त्यांनी मजेशीर भाष्य केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये लहान डोळे असण्याचे फायदे सांगितले आहेत. 'लोक सहसा म्हणतात की ईशान्येकडील लोकांचे डोळे लहान असतात. त्यांचे डोळे लहान असले तरी त्यांची दृष्टी खूप तीक्ष्ण आहे. ते पुढे म्हणाले की, माझे डोळे लहान असल्याने माझ्या डोळ्यात घाण कमी आहे. तसेच जेव्हा जेव्हा एखादा लांबचा कार्यक्रम चालू असतो तेव्हा मी सहज झोपू शकतो आणि कोणालाच कळत नाही.' असे गमंतशीर उत्तर तेमजेन यांनी दिले. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com