ब्रनेईमधील नागपूरकरांची भारताला मोलाची मदत, 600 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर पाठवले मायदेशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pande couple brunei

ब्रनेईमधील नागपूरकरांची भारताला मोलाची मदत, 600 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर पाठवले मायदेशी

नागपूर : ज्या ठिकाणी माणूस लहानाचा मोठा होतो, आपले अस्तित्व निर्माण करतो त्या ठिकाणाबद्दल माणसाला जन्मभर ओढ असते. मायभूमी संकटात असेल तर मन बेचैन होते. ज्या समाजात वावरलो, बागडलो त्या समाजाचे ऋण फेडण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न करीत असतो. मुळचे नागपूरकर असलेल्या पांडे दाम्पत्याने (nagpur pande couple) ब्रुनेई (brunei) या इवल्याशा देशातील भारतीय नागरिकांचे सहकार्य घेत सहाशे ऑक्सिजन सिलिंडर (600 oxygen cylinder) भारताकडे रवाना केले आहेत. भारतासाठी मदत (help to india for corona) साहित्य गोळा करण्यात नागपुरातील डॉ. सोनाली आणि केतन पांडे या दाम्पत्याची महत्त्वाची भूमिका आहे. (nagpur couple in brunei sent 600 jumbo oxygen cylinder to india)

हेही वाचा: कट्टर विरोधकांनाही गडकरींनी पाडली भूरळ, नाना पटोलेंच्या सोशल मीडिया ग्रुपवरही कौतुक

ब्रुनेई देशातील दार-ए- सलाममध्ये भारतीय उच्चायुक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भारतीय नागरिकांनी मदत गोळा केली आहे. याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चार जणांमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन असणाऱ्या पांडे दांपत्याचा समावेश आहे. गेल्या १५ वर्षांपासून ते दार-ए-सलाममध्ये कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी एका आठवड्यात २ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी आणि इतर साहित्य गोळा केले आहे. आज पहिल्या खेपेमध्ये भारतीय नौदलाच्या ‘जलश्‍व’ या जहाजामार्फत ६०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रवाना केले आहेत. यामध्ये, एकूण २९ हजार लिटर आणि ३० हजार किलो ऑक्सिजनचे ३४ संच आहेत. मदतीचा ओघ स्वीकारत भारत सरकारला या तिसऱ्या लाटेमध्ये मदत करण्यासाठी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन समुद्र सेतू-२’ आखत ५ युद्धनौका तैनात केल्या आहेत. याद्वारे ऑक्सिजनसह इतर औषधांचा पुरवठा केला जातो आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने निर्देशित केलेल्या प्राधान्यक्रमाच्या वस्तूंचा यामध्ये समावेश आहे. भारतीय नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर तसेच सामाजिक संघटनांनी देखील यामध्ये योगदान दिले असून ऑक्सिजन सिलिंडर इंडियन रेडक्रॉस सोसायटीला वितरणासाठी स्वाधीन करण्यात येणार आहेत.

Web Title: Nagpur Couple In Brunei Sent 600 Jumbo Oxygen Cylinder To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusNagpur
go to top