बागेश्वर महाराजांना नागपूर पोलिसांकडून क्लिन चिट: Bageshwar Maharaj | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bageshwar Maharaj

Bageshwar Maharaj : बागेश्वर महाराजांना नागपूर पोलिसांकडून क्लिन चिट

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना नागपूर पोलिसांनी क्लिन चिट दिली आहे. (nagpur police clean chit to Bageshwar Maharaj Dheerendra Shastri on shyam manav complaine)

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात यांच्या राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंनिसकडून आक्षेप घेतला गेला. त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दाखल केलेला अर्ज नागपूर पोलिसांकडून दप्तरी दाखल केला होता.

'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

नागपूर पोलिसांनी धीरेंद्र कृष्ण यांचे व्हिडिओ तपासले असता त्यामध्ये अंधश्रद्धा पसरविण्याविरोधात काहीही बोलले नसल्याचा निष्कर्ष काढला आहे.

पोलिसांनी नागपूरमधील दरबाराचं ६ तासांचं फुटेज तपासलं त्यात कुठेही अंधश्रद्धा पसरवली जातेय असं आढळलं नाही. त्यामुळ पोलीस दखलपात्र गुन्हा दाखल करणार नाहीत असं नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलंय.

हेही वाचा: Pune Massacre : पुण्यातही घडलेलं मेंदू सुन्न करणारं 'हत्याकांड', सात जणांचे शीर धडावेगळं करुन...

काय होते आक्षेप?

हे महाराज दावा करतात की, ते भक्तांचं नाव आपोआप ओळखतात, भक्तांच्या वडिलांचं नाव आपोआप ओळखतात. एवढंच नव्हे तर त्यांचं वय आणि मोबाईल नंबरही सांगतात. याशिवाय धीरेंद्र महाराज कोणत्याही भक्ताच्या घरातील कोणत्या खोलीत, कोणत्या कपाटात कोणती वस्तू ठेवली हेही सांगण्याचा दावा करतात.

Karnataka Border Dispute: न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलांना कर्नाटक सरकारकडून दिवसाला ६० लाख

या दाव्यातील पहिल्या भागाला टेलिपथी आणि इंट्युशन म्हणतात. तसेच घरात जाऊन काहीही पाहू शकण्याच्या क्षमतेला अंतर्ज्ञान किंवा दिव्यशक्ती (क्लेरोयान्स) म्हणतात. मी दैवीशक्तीला कोणतंही आव्हान दिलं नाही, तर महाराजांच्या दिव्यशक्तीला आव्हान दिलं आहे,” अशी माहिती श्याम मानव यांनी दिली होती.