

Nainital
esakal
उत्तराखंडमधील नैनितालच्या प्रसिद्ध नैनीझीलमध्ये ६ सप्टेंबर रोजी जलक्रीडा आणि साहसी खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे. नैनिताल ॲक्वॅटिक अँड ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असोसिएशनच्या (NASA) वतीने वार्षिक ॲक्वॅटिक मीट आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशभरातील २०० हून अधिक जलतरणपटू आणि कयाकिंगपटू सहभागी होणार आहेत.
तल्लीताल येथील नासा क्लब-सेंट जोसेफ बोट हाऊस येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.