उत्तरेच्या रणभूमीत 'नमो विरुद्ध रागा'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

वाराणसी/ बहराईच : आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नोटाबंदीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी उभय नेत्यांनी परस्परांवर जोरदार टीका केली.

वाराणसी/ बहराईच : आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नोटाबंदीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी उभय नेत्यांनी परस्परांवर जोरदार टीका केली.

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपांचा समाचार घेताना वाराणसीमध्ये मोदी यांनी त्यांचे अक्षरश: वाभाडे काढले. राहुल गांधी बोलायला लागल्यामुळे मला अत्यानंद झाला असून आता संभाव्य राजकीय भूकंपाची शक्‍यताच संपुष्टात आली आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच विरोधी पक्षांचे वर्तन हे दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावे म्हणून कव्हरफायरिंग करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांसारखे असल्याची चपराक मोदी यांनी लगावली. यावर उत्तर प्रदेशातील बहराईचमध्ये जनआक्रोश सभेत बोलताना राहुल यांनी माझी कितीही थट्टा करा, पण देशातील जनतेला उत्तर द्या, असे आवाहन मोदींना केले.

मोदी म्हणाले
विरोधक भ्रष्ट आणि अप्रामाणिक लोकांच्या पाठीशी
राहुल गांधी बोलल्याने "अंदर की बात' समजली
डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीत मोठे गैरव्यवहार
देशातील गरिबीतून विरोधकांचा नाकर्तेपणा दिसतो
नोटाबंदीस जनतेने पाठिंबा दिल्याने मी त्यांचा ऋणी आहे

राहुल म्हणाले
मिळालेल्या "सहारा'च्या पाकिटांमध्ये काय होते?
बॅंकांसमोरील रांगांमध्ये प्रामाणिक लोक उभे आहेत
शेतकरी, कामगार, मजुरांना नोटाबंदीचा फटका
विमानातून प्रवास करणाऱ्यांकडे काळा पैसा
नोटाबंदी हा सामान्यांवरील सर्जिकल स्ट्राइक

. . . . . .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: namo vs raga in up