esakal | ब्राम्हण समाजाविषयी अपशब्द; मुख्यमंत्र्यांच्या वडिलांची तुरुंगात रवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Nandkumar Baghel

ब्राम्हण समाजाविषयी अपशब्द; मुख्यमंत्र्यांच्या वडिलांची तुरुंगात रवानगी

sakal_logo
By
सुधीर काकडे

छत्तीसगडचे (Chhattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांचे वडील नंदकुमार बघेल (Nandkumar Baghel) यांनी ब्राम्हण समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याने सर्व ब्राम्हण समाज संघटनेकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. आज नंदकुमार बघेल यांना न्यायालयात सादर करण्यात आले होते. रायपुर न्यायालयाने नंदकुमार बघेल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावर बोलताना, नंदकुमार बघेल यांनी चूक केली असेल, तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी दिले होते.

'सर्व ब्राम्हण समाज' या संघटनेने मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. 'ब्राम्हण हे परदेशी असून त्यांच्यावर बहिष्कार टाका, त्यांना गावात येऊ देऊ नका' असे वक्तव्य नंदकुमार यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. नंदकुमार बघेल यांना आज रायपुरमधील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना आज १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती नंदकुमार बघेल यांचे वकील गजेंद्र सोनकार यांनी दिली.

हेही वाचा: विधानसभेसाठी मायावतींची जुनीच रणनीती; ब्राह्मण मतांवर 'लक्ष्य'

दरम्यान, आवश्यकता भासल्यास नंदकूमार बघेल यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केल्या जाईल अशी प्रतिक्रीया दिली होती. "मुख्यमंत्री म्हणून माझ्यावर वेगवेगळ्या समाजांमध्ये सुसंवाद राखण्याची जबाबदारी आहे. जर नंदकुमार बघेल यांनी एखाद्या समुदायाविरुद्ध टिप्पणी केली असेल तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो." असे मत मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी व्यक्त केले होते.

loading image
go to top