Narayan Murthy : नारायण मूर्तींच्या ७० तासांच्या विधानामुळे वाद ! सर्वाधिक काम कोणत्या देशात केले जाते? जाणून घ्या

कॉर्पोरेट क्षेत्रापासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनी मूर्तींच्या या व्यक्तव्यावर आक्षेप घेत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत
Narayan Murthy
Narayan Murthyesakal

Narayan Murthy : इंफोसिसचे सह-संस्थापक एन.आर नारायण मूर्ती यांच्या काम करण्याच्या तासांवरील वक्तव्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. "देशाची उत्पादकता वाढवण्यासाठी तरूणांनी आठवड्यातून ७० तास काम करावे." असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर एक्सवर (ट्विटरवर) खळबळ उडाली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रापासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनी मूर्तींच्या या व्यक्तव्यावर आक्षेप घेत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

खरं तर जगभरात कुठेही आठवड्याभरात ७० तास काम केले जात नाही. जगभरात संपूर्ण आठवड्याभरात सरासरी ४०-४४ तास कर्मचारी काम करतात. काम करण्याचे तास लक्षात घेत Mauritania मध्ये 54 तास, इजिप्तमध्ये ५३ तास तर गांबियामध्ये ५१ तास आणि कतरमध्ये ५० तास काम केले जाते. तर भारतात आठवड्याभरात सरासरी ८४ तास कर्मचारी काम करतात.

आता प्रश्न उरतो तो नारायण मूर्तींच्या वक्तव्याचा

इंफोसिसचे सीइओ मोहनदास पईसह '3वन4' कॅपिटलचा पॉडकास्ट 'द रेकॉर्ड' च्या उद्घाटन एपिसोडमध्ये बातचितदरम्यान मूर्ती म्हणाले की, "तरुणांना अग्रणी अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करण्यासाठी अतिरिक्त तास काम करायला हवं. त्यांनी भारताची तुलना चीन,जपान आणि जर्मनीशी करत म्हटले की भारताची उत्पादकता जगभरात सगळ्यात कमी आहे. जेव्हापर्यंत आपण आपल्या कार्यात उत्पादकता वाढवत नाही तेव्हापर्यंत आपण इतर देशांची स्पर्धा करू शकत नाही. तेव्हा देशातील तरुणांनी स्वत:हून आठवड्यात ७० तास काम करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा."

Narayan Murthy
Narayana Murthy Donations: नारायण मूर्ती-सुधा मुर्तींनी तिरुपती मंदिराला दान केली २ किलो सोन्याची मूर्ती, किंमत ऐकून व्हालं थक्क...

एक्स यूजर्सच्या प्रतिक्रिया

मूर्तींच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी तरुणांना काम करण्यास प्रेरणा देणारं वक्तव्य असल्याचं म्हणत त्यांचं कौतुक केलंय तर अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतलाय.

एका एक्स यूजरने जास्त काम केल्याने तणाव आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवल्याचे सांगितले. त्याने त्यांचा वयक्तिक अनुभव सांगत लिहीले की, "कामाच्या तणावामुळे मला वयाच्या ३८ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला. आणि आता मला औषधांवर अवलंबून राहावे लागत आहे."

Narayan Murthy
Narayana Murthy: इतरांना 70 तास काम करण्याचा सल्ला देणारे नारायण मूर्ती स्वतः किती तास काम करायचे?

मूर्तींच्या वक्तव्याचे अनेक कॉर्पोरेट दिग्गजांनी समर्थनसुद्धा केले आहे. जेएसडब्ल्यू समुहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल म्हणाले, "मूर्तींचे वक्तव्य कामाबाबत असलेल्या निष्ठेबाबत आहे. आपल्या भारताला २०४७ पर्यंत महाशक्ती बनवण्यासाठी ते महत्वाचे आहे. ओला कॅबचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत मूर्तींचे समर्थन केले आहे. "ही ती वेळ आहे जेव्हा आपण एवढे काम करावे की इतर जे देशात जी प्रगती अनेक पिढ्यांनी मिळून केली ती आपण एकाच पिढीत करू शकू." असे त्यांनी पोस्टमध्ये लिहीले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com