चक्क भाजप आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जुलै 2019

भोपाळ : देशाभरात भाजपचे वारे वाहत असताना एकामागोमाग काँग्रेसचे आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. मात्र, मध्य प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला असून, नारायण त्रिपाठी आणि शरद कोल या आमदारांनी विधिमंडळामध्ये चक्क कॉंग्रेसच्या बाजूने मतदान केले. विशेष म्हणजे, हे दोन्ही आमदार आधी कॉंग्रेसमध्येच होते.

कर्नाटकमधील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर कमलनाथ यांनीही त्यांचा बालेकिल्ला आणखी मजबूत करायला सुरवात केली असून, आज मांडण्यात आलेल्या गुन्हेगारी कायदा सुधारणा विधेयक-2019 वर मतदान घेण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने 122 मते पडली असून, यात भाजपच्या दोन आमदारांचाही समावेश आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Tripathi support to Kamal Nath govt bill in assembly