
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अलीगड मुस्लिम युनिवर्सिटीच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात सहभाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अलीगड मुस्लिम युनिवर्सिटीच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात सहभाग घेतला. देशात जे काही आहे त्यावर देशातील प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. राज्य घटनेने आपल्याला तो अधिकार दिला आहे, असं मोदी म्हणाले. याआधी 1964 साली तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे AMU मध्ये भाषण झालं होतं. त्यांचं भाषण अनेक अर्थांनी महत्वपूर्ण ठरलं. चीनसोबतच्या युद्धात भारताला नुकताच पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच पंडित जवाहरलाल नेहरु यांचे निधन झाले होते.
लालबहादुर शास्त्री यांनी 19 डिसेंबर 1964 रोजी अलिगड मुस्लिम यूनिवर्सिटीत भाषण दिलं होतं. त्यातील काही अंश...
ताडी प्यायल्यानं कोरोना होत नाही; उत्तर प्रदेशमधील नेत्याचा अजब दावा
भविष्यात आपले साध्य काहीही असो, पण आपण स्वत:ला सर्वातआधी भारताचे नागरिक मानले पाहिजे. तुम्हाला संविधानानुसार दिलेले अधिकार मिळाले आहेत, पण त्यासोबत तुम्हाला काही कर्तव्यही समजून घ्यावे लागतील. आपल्या लोकशाहीच्या स्वातंत्र्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी आपल्याला काही कर्तव्य पार पाडावे लागतील. एक चांगला नागरिक तो आहे, जो कायद्यांचे पालन करतो. पोलिस नसतानाही आपण ते पालन केले पाहिजे. पूर्वी आपल्याला आत्मसंयम आणि अनुशासन पालक आणि शिक्षकांकडून मिळायचा, पण वर्तमान स्थिती बदलली आहे.
आपल्याला कोणतीही जबाबदारी दिली असेल, ती आपण पूर्ण प्रामाणिकपणे आणि क्षमतेने पार पाडावी. दुसऱ्यांवर टीका करण्याआधी आपण आपलं काम ठीक करतो आहोत का नाही हे पाहायला हवं. धर्मनिरपेक्षतेबाबत आमचा दृष्टीकोण स्पष्ट आहे. विविधता असली तरी भारत एक आहे. देशाची प्रगती व्हायची असेल, तर देशात विभाजनवादी आणि अराजकवादी प्रवृत्ती नसायला हव्यात. सुरुवातीच्या काळातच मुलांमध्ये धर्मनिरपेक्षतेचे बीज रोवायला सोपे जाते.
देशातील मुस्लिम मुलींना 'स्वच्छ भारत मोहिमे'नं मोठा दिलासा मिळाला :PM...
लोकांमधील द्वेष, एकमेकांच्या समुदायाबाबत चीड, अविश्वास निर्माण होणे कोणत्याही समाजासाठी चांगलं नाही. सध्यासारखी वाईट स्थिती पूर्वी कधी निर्माण झाली नव्हती. युद्ध आणि संघर्षामुळे कोणतेही समाधान मिळत नाही. आर्थिक समानता समुदायात निर्माण होणे आवश्यक आहे. सर्व संपत्ती काही लोकांच्या हाती एकवटावी असं आपल्याला होऊ द्यायचं नाही. आपल्या महान संस्कृतीमध्ये सर्व समुदायातील महान लोकांचे योगदान आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी आणि इतर समुदायांनी एकत्र येऊन गरिबी, आजार आणि अशिक्षितपणा यापासून मुक्त व्हायला हवं.